छत्रपती संभाजीनगर,(सांजवार्ता ब्युरो): महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज अखेर जाहीर झाला. यात राज्याचा निकाल९२.९ टक्के लागला तर छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल ८८.४१ टक्के लागला. बारावीप्रमाणेच दहावीतही मुलींनीच बाजी मारली आहे. यंदा कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल लागला असून राज्यातून पुढे आहे. तर सर्वात कमी निकाल छत्रपती संभाजीनगर विभागाचा लागला आहे. यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. दहावी निकालात उत्तीर्ण होण्याचे प्रमाण हे ९४.९६ टक्के तर मुलांची प्रमाण हे ८९. ५६ टक्के असून ५.४० टक्क्यांनी मुलींची उत्तीर्णचे प्रमाण सर्वाधिक आहे.
बोर्डाच्या वतीने दहावीचा निकाल लागणार केव्हा? याकडे सर्वांचेच लक्ष लागून होते. अखेर राज्यमंडळाच्या वतीने आज दुपारी एक वाजता दहावीचा ऑनलाइन निकाल जाहीर करण्यात आला. त्यात कोकण, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, पुणे, मुंबई, अमरावती, नाशिक, कोल्हापूर, लातूर या नऊ विभागातून १५ लाख ५५ हजार २६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी एकूण १५ लाख ४२ हजार ४७२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी एकूण १४ लाख २० हजार ४८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली या संपूर्ण छत्रपती संभाजीनगर विभागातून १ लाख ८६ हजार ५९८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी एकूण १ लाख ८४ हजार ९४० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १ लाख ६३ हजार ५२० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एकूण छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल ८८.४१ टक्के लागला.
एकूण राज्याचा असा निकाल
राज्याचा निकाल पाहिला तर कोकण सर्वाधिक पुढे असून ९७.६२ टक्के कोकणचा निकाल लागला आहे. तर कोल्हापूर विभागाचा निकाल ९५.४७ टक्के लागला असून कोल्हापूर दोन नंबरवर आहे. तर मुंबई- ९४ ९७% टक्के लागला असून तीन नंबरवर आहे. तर पुणे चार क्रमांकांवर असून पुणे निकालात ९४ २४% आहे. तर नाशिक विभागाचा निकाल ९०.५३% लागला असून नाशिक पाच नंबरवर आहे. तर अमरावती विभागाचा निकाल ९०.५०% लागला असून अमरावती सहाव्या क्रमांकावर आहे. नागपूरचा निकाल ८९.७% असून सातव्या क्रमांकावर आहे. तर लातूर विभागाचा निकाल ८८.४२% लागला असून लातूर दहावी परीक्षेत आठव्या क्रमांकावर आहे. तर सर्वात कमी निकाल छत्रपती संभाजीनगरचा लागला आहे. छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल ८८.४१ टक्के लागला आहे.
सोळा पैकी वीस विषयांचा निकाल शंभर टक्के
बोर्डाच्या वतीने घेण्यात आलेल्या परिक्षेत ६४ विषयांची परिक्षा घेण्यात आली होती. त्यापैकी वीस विषयांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. तसेच ६ हजार ६१२ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. यंदा मागील वर्षीच्या तुलनेत १.२ टक्क्याने निकालात घसरण झाली आहे. मागील वर्षी दहावीचा निकाल ९४.१० टक्के लागला होता तर यंदा ९२.९ टक्के लागला आहे.
राज्याचा एकूण निकाल- ९२.९ टक्के
कोकण- ९७.६२ %
कोल्हापूर- ९५ ४७%
मुंबई- ९४ ९७%
पुणे-९४ २४%
नाशिक -९०.५३%
अमरावती-९०.५०%
नागपूर-८९.७%
लातूर-८८.४२%
छत्रपती संभाजीनगर-८८.४१